सुझुकीने BS-6 इंजिनसह लाँच केली ‘बर्गमॅन स्ट्रीट’ स्कूटर

सुझुकी मोटरने बीएस 6 इंजिनसह बर्गमॅन स्ट्रीट (Burgman Street) स्कूटर लाँच केली आहे. कंपनीची ही प्रिमियम स्कूटर 125 सीसी सेगमेंटमध्ये येते. चांगल्या रायडिंग अनुभवासाठी कंपनी यात इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट आणि किल स्विच दिले आहे, ज्याद्वारे कमि इमिशन होईल. या स्कूटरच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

बर्गमॅन स्ट्रीटच्या पुढील व मागील बाजूला क्रोम एक्सेंट देण्यात आले आहे. यात बॉडी-माउंडेट विंडस्क्रीनसह अपवर्ड मफलर डिझाईन देण्यात आले आहे. याच्या फ्रंटला एईडी हेडलाईट्स मिळतील. या स्कूटरमध्ये लांब सीटसोबतच फ्लेक्सिबल फुट पोजिशन मिळते. मोबाईल चार्जिंगसाठी यात डीसी सॉकेट देण्यात आलेले आहे. आधीच्या तुलनेत नवीन बर्गमॅन स्ट्रीट अधिक मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

Image Credited – ZigWheels

नवीन सुझुकी बर्गमॅन स्ट्रीट स्कूटरमध्ये ऑल एल्युमिनियम 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, 124 सीसी इंजिन देण्यात आलेले आहे. बीएस6 मानक इंजिन आणि फ्यूल इंजेक्शन इंजिन तंत्रामुळे स्कूटर सहज सुरू होते. यामध्ये सुझुकी इको सपोर्ट देखील मिळेल.

Image Credited – The Economic Times

ही नवीन स्कूटर 6750 आरपीएमवर 8.7 पीएस मॅक्सिमम पॉवर आणि 5500 आरपीएमवर 10एनएम टॉर्क जनरेट करते. यात इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट आणि किल स्विच मिळेल. ज्याच्या मदतीने ट्रॅफिकमध्ये देखील स्कूटर स्टार्ट करण्यास अडचण येणार नाही. यात कम्बाईंड ब्रेकिंग सिस्टम फीचर देखील मिळते.

ही स्कूटर मॅटेलिक मॅट फिब्रॉइन ग्रे, पिअर्ल मिरेज व्हाईट, मॅटेलिक मॅट ब्लॅक नं. 2 आणि मॅटेलिक मॅट बोर्डेक्स रेड रंगात मिळेल. या स्कूरटची एक्स शोरूम किंमत 77,900 रुपये आहे.

Leave a Comment