12 दिवसात हे काम न केल्यास बंद होईल बँक खाते

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून अलर्ट केले आहे. जर ग्राहकांनी बँकेचे म्हणणे ऐकले नाही तर ग्राहकांचे खाते फ्रीज केले जाऊ शकते. ग्राहक खात्याद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यास सांगितले आहे. यासाठी अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2020 निश्चित करण्यात आली असून, जर ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पुर्ण न केल्यास खाते फ्रीज (ब्लॉक) केले जाईल.

केवायसी प्रक्रिया पुर्ण केल्याशिवाय तुम्ही खात्याद्वारे व्यवहार करू शकत नाहीत. बँक खाते उघडणे देखील याशिवाय शक्य नाही. जर तुम्ही म्यूचअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी केवायसी अनिवार्य आहे. याशिवाय अतिरिक्त लॉकरची सुविधा, पीएफची रक्कम काढण्यासाठी देखील केवायसी पुर्ण असणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँक खातेधारकांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे. याबाबत एसबीआयने आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सुचित देखील केले आहे. यासाठी खातेधारकांनी कागदपत्रासह आपल्या एसबीआय शाखेशी संपर्क करणे गरजेचे आहे.

एसबीआयच्या वेबसाईटनुसार, केवायसीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा कार्ड इत्यादी ओळखपत्रांचा वापर करता येईल. याशिवात पत्त्याची माहिती देण्यासाठी टेलिफोन बिल, वीजेचे बिल, रेशन कार्ड, बँक खाते विवरण, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट इत्यादी गोष्टी गरजेच्या आहेत.

Leave a Comment