रेनॉल्ट लाँच करणार ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक कार

भारतात मागील 1-2 वर्षांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या आहेत. आता रेनॉल्ट कंपनीने देखील मेड इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनी ही कार 2022 पर्यंत लाँच करू शकते.

रेनॉल्टची ही भारतात बनणारी इलेक्ट्रिक कार CMF-A फ्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ही इलेक्ट्रिक कार क्विडच्या आकाराची असेल.

ही इलेक्ट्रिक कार कंपनीची सेकेड जनरेशन क्विडचे इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. कंपनीने वर्ष 2015 मध्ये भारतात क्विड लाँच केली होती. वर्ष 2019 मध्ये कंपनीने क्विडचे अपडेटेड मॉडेल लाँच केले होते.

Image Credited – autocarindia

या कारमध्ये 33 kW मोटार देण्यात येईल. जे 120 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचे म्हणणे आहे की कारला चार्ज करण्यासाठी 220V प्लग चार्जिंग प्लाइंडचा वापर करण्यात येईल.

फास्ट चार्जिंग मोडमध्ये रेनॉ के-झेडई कार 50 मिनिटात 50 टक्के चार्ज होईल. तर स्लो चार्जिंग मोडमध्ये कारला फुल चार्ज होण्यासाठी 4 तास लागतील. एकदा फुल चार्ज केल्यावर ही कार 240 किमी अंतर पार करू शकते.

लूकमध्ये ही कार रेनॉ क्विड सारखी असेल. ग्रिलमध्ये बदल करण्यात आले असून त्यात मोठ्या आकाराचा लोगो देण्यात येईल. नवीन एलईडी हेडलॅम्प, नवीन फ्रंट आणि रिअर बंपर व नवीन डिझाईनचे टेललाइट आहे.

Leave a Comment