
आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने बनवले आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट राम गोपाल वर्मा यांनी तयार केल्यानंतर राम गोपाल वर्मा आता हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर चित्रपट तयार करणार आहेत.
आता हैद्राबाद बलात्कार प्रकरणावर चित्रपट बनवणार रामगोपाल वर्मा
राम गोपाल वर्मा यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी हैद्राबाद विमानतळ पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी यावेळी शमशाबादचे एसपी एन्काऊंटर मॅन म्हणून प्रसिद्धी मिळवलेले सीसी सज्जनार यांची भेट घेतली. वर्मा यांनी त्यांची भेट घेऊन बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. जेणेकरुन चित्रपटातील पटकथेत याचा फायदा होईल.
