जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्य तेल चांगले

किचनमध्ये कुंकिग ऑईलचे महत्त्व सर्वाधिक असते. डाळीला फोडणी देण्यापासून ते भाजी बनविण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी तेल गरजेचे असते. तेल आणि आरोग्याचा देखील जवळचा संबंध आहे. आरोग्याप्रती जागृक होऊन लोक अनेकवेळा आपले खाद्य तेल बदलतात. काही अभ्यासानुसार ऑलिव्हचे तेल अधिक चांगले असते तर काहींनुसार अ‍ॅव्होकॅडोचे तेल अधिक चांगले असते. मात्र तुमच्यासाठी कोणते तेल चांगले आहे माहिती आहे का ?

रिफाइंड तेल प्रत्येक किचनचा महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना वाटते की रिफाइंड तेल आरोग्यासाठी चांगले आहे व त्याद्वारे प्रत्येक गोष्ट बनवता येते. मात्र रिफाइंड तेल तुमच्या स्वयंपाकासाठी व आरोग्यासाठी देखील चांगले नाही.

रिफाइंड तेल बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये हाय टेम्परेचरचा वापर होतो. ज्यामुळे यातील न्युट्रिशन (पोषक तत्व) कमी होते. रिफाइंड तेलामध्ये ट्रांस फॅट देखील आढलते, जे आरोग्याला नुकसान पोहचवते.

रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाण्याचे तेल अधिक चांगले आहे. हे तेल बनविण्यासाठी कोणत्याही टेम्प्रेचर तंत्राचा वापर होत नाही, यामुळे यातील न्यूट्रिशन कायम राहते. मोहरीच्या तेलाला चांगले अँटीबॅक्टेरियल समजले जाते व हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. यापासून तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या बनवू शकता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment