केरळच्या या भटक्या कुत्र्याला नेणार स्विर्झलँडला; पण का ?

अनेकदा रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असल्याने, त्यांना लोक मारत असल्याचे आपण पाहत असतो. मात्र केरळमधील एका भटक्या कुत्र्यासोबत खास गोष्ट घडणार आहे. केरळमधील एका भटक्या कुत्र्याला थेट स्विर्झलँडला पाठवण्यात येणार आहे.

स्विर्झलँडचे दोन पर्यटक जॉनी आणि अ‍ॅलेन भारतात आले आहेत.  केरळमधील मुन्नार येथे त्यांना एक कुत्रे भलतेच आवडले. दोघांनी विचार केला की जेवढे दिवस मुन्नारमध्ये आहोत, तोपर्यंत या भटक्या कुत्र्याची काळजी घेऊ. मात्र तीन दिवसात दोघांनाही हे कुत्रे एवढे आवडले की, त्यांनी त्याला स्विर्झलँडलाच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आता ते कुत्र्याला दत्तक घेणार आहेत व स्वतः बरोबर स्विर्झलँडला घेऊन जाणार आहेत.

या कुत्र्याचे नाव ‘नॅनी’ ठेवण्यात आले आहे. ते दोघेही दररोज त्याला आंघोळ घालतात, घायला देतात, त्याची काळजी घेतात. त्याला मायक्रोचिप देखील लावण्यात आली आहे, जेणेकरून त्याची ओळख करता येईल.

सध्या नॅनीला नेण्याची कागदी कारवाई सुरू असून, काही चाचण्या पुर्ण झाल्यानंतर जॉनी आणि अ‍ॅलेन या भटक्या कुत्र्याला आपल्या सोबत स्विर्झलँडला घेऊन जातील.

Leave a Comment