इंदुरीकर महाराजांचे समर्थकांना पत्रकाद्वारे शांतता राखण्याचे आवाहन


अहमदनगर : एका वक्तव्यामुळे हभप किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. समतिथीला स्त्रियांशी संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगी होते असे वक्तव्य एका किर्तनात त्यांनी केले होते. ते त्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले.

यादरम्यान अनेक लोक इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असता महाराजांकडून आवाहन करण्यात आले आहे. इंदुरीकरांनी पत्रकाद्वारे आपल्यासाठी कुणीही मोर्चे… आंदोलने करू नये, असे आवाहन केले आहे. इंदुरीकर महाराजांनी या पार्श्वभुमीवर आपल्या समर्थकांना पत्रामार्फत संदेश दिला आहे. त्यांनी यामध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी आपण न्यायाच्या मार्गाने जाणार असल्याचे त्यांनी या पत्रातून स्पष्ट केले आहे.

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराजांचं विधान चुकीचं असून त्याच समर्थन करत नसल्याचे केले आहे. त्यांनी पक्षाची ही भूमिका नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. समाज प्रबोधनाचे काम इंदुरीकर करतात. त्यांच्या अनेक किर्तनाला मी गेलो आहे. अनेक सामाजिक विषय ते हाताळतात. त्यांचे महिलांविषयीचे विधान चुकीचे आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण एका विधानाने माणूस चुकीचा होत नाही. इंदुरीकर महाराजांच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे ते म्हणाले.

दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मलुन समिती इंदुरीकर महाराजांनी महिलांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आक्रमक झाली आहे. त्याचबरोबर अंनिसने इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment