चांगले काम करायचे म्हटले तर एवढा त्रास तर होणारच – इंदुरीकर


बीड – रविवारी दुपारी बीड जिल्ह्यातील आष्टीतील कड्याजवळच्या कुंभारवाडीमध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. इंदुरीकर महाराजांचे या कीर्तनाला येताना जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ अशा नावाचे फलक घेतलेले लोक या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर लोकांच्या हातात महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशाही आशयाचे फलक देखील होते.

इंदुरीकर महाराज या कीर्तनामध्ये बोलताना म्हणाले की, सध्या माझे दिवस वाईट आहेत, एखादे चांगले काम करताना एवढा त्रास होणारच. मला त्या विषयावर काहीच बोलायचे नसल्याचे मत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केले. घरच्यांसाठी कमी व समाजासाठी मी जास्त वेळ देत आहे. ते चुकीचे वाटत असेल तर मला वेगळा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment