‘तेजस’मधील कंगनाचा फर्स्टलूक तुम्ही पाहिला का ?


नुकताच बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘तेजस’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. कंगना या चित्रपटात एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत झळकणार आहे. कंगनाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा लूक शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कंगना तेजसमध्ये एअरफोर्स पायलटच्या रुपात दिसणार आहे.


सर्वेश मेवाड यांनी तेजसचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. चित्रपटाचे शूटिंग उन्हाळ्यात सुरू होईल तर हा चित्रपट एप्रिल 2021 मध्ये रिलीज होईल. या चित्रपटात कंगना फाइटर पायलटची भूमिका साकारणार आहे. 2016 मध्ये महिलांचा फायटर्सच्या रुपात समावेश करणारी भारतीय वायू सेना देशातील संरक्षण दलात प्रथम होती. या ऐतिहासिक घटनेने हा चित्रपट प्रेरित आहे.

Leave a Comment