सलाम तिच्या जिद्दीला ! अमेरिकावारीसाठी सज्ज झाली नाचणी विकून हॉकी स्टीक खरेदी करणारी पुंडी


रांची : जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीप्रती पूर्णपणे समर्पक वृत्तीने काम करता, तुमच्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आणि याच समर्पक वृत्तीवर तेव्हा यशप्राप्तीची संधीही तुम्हाला मिळते. याचा प्रत्यय अनेकदा काही यशोगाथांच्या माध्यमातून आला आहे. क्रीडा जगतात सध्याही परिस्थिती आणि हतबलतेवर मात करणाऱ्या अशाच एका खेळाडूची संघर्षगाथा तिला प्रकाझोतात आणत आहे.

त्याचे ताजे उदाहरण ठरत आहे झारखंडमधील एका नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या खुंटी जिल्ह्यातील हेसल या गावातील ही खेळाडू. आता येत्या काळात सातासमुद्रापार जाण्यासाठी जी सज्ज झाली आहे. जे स्वप्न तिने उरी बाळगले होते, आता त्या स्वप्नाला पंख लागले आहेत. कारण, हेसल या लहानशा गावातून ती थेट अमेरिकेला जाण्यास सज्ज झाली आहे. या खेळाडूचे पुंडी सारू असे नाव आहे. पाच भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पुंडीच्या मोठ्या भावाने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुंडी स्वत: नववीत आहे. तर, तिच्या एका बहिणीने परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेचा पुंडीच्या मनावर मोठा परिणाम झाला होता.

पुरती तुटलेल्या काळात पुंडी हॉकी या तिच्या सर्वाधिक आवडीच्या खेळापासून दूर राहिली. पण, हा खेळ मात्र ती विसरली नव्हती. पूर्वी रोजंदारी भत्त्यावर मजुरीचे काम सध्याच्या घडीला घरातच असणारे पुंडीचे बाबा हे करायचे. ते कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करायचे. पण, त्यांच्या हाताला एका अपघातात जबर दुखापत झाली. त्यांचा हात प्लॅस्टरच्या सहाय्याने जोडलाही गेला पण, त्यांचे मजुरीचे काम मात्र बंद झाले.

जेव्हा जवळपास तीन वर्षांपूर्वी तिने या खेळात नावलौकिक मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते, तेव्हा हॉकी हा खेळ खेळण्यासाठी तिच्याकडे हॉकी स्टीकही नव्हती. तिने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना याबाबती माहिती दिली. हॉकी स्टीकसाठी घरी पैसे नसल्यामुळे मग मी तेव्हा नाचणी विकली. ज्यामध्ये शिष्य़वृत्ती म्हणून मिळालेले १५०० रुपये जोडले आणि कुठे जाऊन एक हॉकी स्टीक खरेदी केल्याचे पुंडी म्हणाली.

पुंडीचे वडील सध्याच्या घडीला जनावरांना चारा चारण्याचे काम करतात. तर आई घरकाम करते. शेती, जनावरांचे पोषण आणि त्यांची खरेदी यावरच तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा अवलंबून आहे. आपल्या सहनशीलतेची परिस्थिती प्रत्येक वळणावर परिसीमा पाहत असली तरीही पुंडीच्या आत्मविश्वासापुढे पण ही आव्हानेही फिकी पडली.

Leave a Comment