फेसबुकच्या या व्हर्जनमध्ये आले ‘डार्क मोड’ फीचर

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या फेसबुकचे लाईट  व्हर्जन वापरणाऱ्या अँड्राईड युजर्ससाठी डार्क मोड फीचर लाँच केले आहे. कंपनी लवकरच हे फीचर आयओएस युजर्ससाठी देखील लवकरच लाँच करणार आहे.

कंपनीने फेसबुकच्या मुख्य अ‍ॅपला अद्याप डार्क मोड फीचर दिलेले नाही. फेसबुक लाईट अ‍ॅपमध्ये डार्क मोड वापरण्यासाठी युजर्सला अ‍ॅप अपडेट करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे डार्क मोड पर्याय ऑन करावा लागेल. अशाच प्रकारे युजर्स हे फीचर बंद देखील करू शकतात. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व युजर्ससाठी हे फीचर रोल आउट होण्याची शक्यता आहे.

याआधी फेसबुकच्या मालकीचे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्राईड बीटा व्हर्जनसाठी डार्क मोड फीचर लाँच करण्यात आलेले आहे. हे फीचर अँड्राईड बीटा व्हर्जन 2.20.13 साठी उपलब्ध आहे.

 

Leave a Comment