…म्हणून या ठिकाणी महिला न्यायाधीश करते वाहतूक नियंत्रित

नायझेरियाच्या राजधानी अबुजा येथे 38 डिग्री तापमानात एक महिला वाहतूक नियंत्रण करताना दिसते. ही महिला वाहतूक पोलीस नसून, तेथील न्यायाधीश मोनिका डोंगबन-मेंसेम आहे. मुलाचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अबुजामधील वाहतूक सुधारण्यासाठी पाऊल उचलले. मागी 8 वर्षांपासून न्यायालय बंद झाल्यावर त्या वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येतात.

मोनिका यांच्यानुसार, चालकांना ट्रेनिंग-वाहतूक नियमांची माहिती नाही, त्यामुळे अपघात होतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही जणांमध्ये देखील बदल आला, तर त्यांची मेहनत यशस्वी होईल असे त्यांना वाटते.

मोनिका यांनी सांगितले की, 2011 मध्ये मुलाच्या अपघाताची माहिती मिळाली. पोहचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याला एका कारने धडक दिली होती. दोन्ही पायांना दुखापत झाली होती. वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहचवले असते, तर त्याचे प्राण वाचले असते. जेथे अपघात झाला, तेथील रस्ता देखील चांगला नव्हता. अनेकदा तक्रार करून देखील रस्ता व्यवस्थित केला नव्हता.

मोनिका म्हणाल्या की, माझ्या मुलाचे निधन कोणामुळे झाले हे मला माहिती नाही. मात्र कोणत्याही दुसऱ्या आईबरोबर असे घडू नये म्हणून मी याच्या मूळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.

मोनिका यांनी सांगितले की, त्यांनी बस स्टँड, पार्किंग येथे जाऊन चालकांशी संवाद साधला. मात्र त्यांना वाहतुकीबद्दल, नियमांबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यानंतर वाहतूक विभागाकडून वाहतूक अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले.

मोनिका यांनी क्वाप्डास रोड सेफ्टी डिमांड नावाची संस्था सुरू केली. ही संस्था चालकांना रस्ते सुरक्षेबद्दल मोफत माहिती दिली जाते. त्या लवकरच एक शाळा सुरू करणार आहेत, जेथे मोफत ड्रायव्हिंग शिकवले जाईल.

Leave a Comment