विकीने ‘भूत’च्या सेटवर अनुभवला चमत्कार?


विकी कौशलच्या आगामी ‘भूत द हाँटेड शिप’ बाबत सध्या जोरात चर्चा सुरु आहे. दरम्यान विकी कौशलने या चित्रपटाच्या सेटवर शुटींगच्या दरम्यान घडलेली एक अजब घटना शेअर केली आहे. विकीच्या म्हणण्यानुसार तो हॉरर चित्रपट पाहायला घाबरतो. त्याला भूताचीही भीती वाटते. विकी सांगतो शुटींग सुरु असताना अचानक एक शिडी त्याच्या अंगावर कोसळणार होती पण चमत्कार घडला आणि शिडी त्याच्यापासून तीन फुटांवर येऊन थांबली. तेव्हाच विकीला या सेटवर काहीतरी आहे आणि आमच्यामुळे त्याला त्रास होत असावा असे जाणवले.

विकीने विनंती केली, ‘आम्ही तुमची बायोपिक बनवितोय. कृपया ती व्यवस्थित बनू दे.’ विकी सांगतो या हॉरर चित्रपटात काम करण्यासाठी कसाबसा धीर गोळा केला. ही भीती मला घालवायची आहे. विकीला वॉटर फोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते. तो म्हणाला या भीतीवर मात करून २५ फुट खोल पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला पण रात्रीच्या वेळी खोल समुद्रात जेव्हा स्कुबा डायव्हिंग करू शकेन तेव्हाच माझी पाण्याची भीती गेली असे म्हणेन.

भूत मध्ये त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि आशुतोष राणा हे कलाकार असून हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment