आम आदमी केजरीवाल यांना या कार्स पसंत


फोटो सौजन्य फिनान्शियल एक्सप्रेस
दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर तिसऱ्या वेळी विराजमान झालेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल येण्याजाण्यासाठी वेगवेगळ्या कार्सचा वापर करतात हे अनेकांनी नोटीस केले असेल. पण या आम आदमीला नक्की कोणत्या कार्स अधिक आवडतात हे पहिले तर केजरीवाल यांची पहिली पसंती आहे मारुती सुझुकीची वॅगन आर ही आम गाडी. ती केजरीवाल यांच्या प्रतिमेला अगदी साजेशी म्हणजे सर्वसामान्य माणसाला सहज परवडणारी फॅमिली कार आहे. केजरीवाल यांना ही कार त्याच्या युके मध्ये राहणाऱ्या एका चाहत्याने भेट दिली आहे.

केजरीवाल अनेकदा मारुती सुझुकी अल्टो मधूनही प्रवास करताना दिसतात. ही कारही त्यांना आवडते तसेच त्याच्या पसंतीची महागडी कार आहे टोयोटाची इनोव्हा एमपीयु. मोठे कुटुंब आरामात प्रवास करू शकेल अशी जुन्या जनरेशनची कार केजरीवाल अनेकदा वापरतात.

केजरीवाल दरवेळी काही महिन्यांनी कार बदलताना दिसतात तेव्हा त्यांच्याकडे इतक्या कार येतात कुठून असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर असे आहे, की केजरीवाल ज्या कार्स चालवितात त्यातील बहुतेक कार्स त्यांचे कार्यकर्ते अथवा नेते यांच्या मालकीच्या आहेत. ते काहीवेळा केजरीवाल यांना कार गिफ्ट देतात आणि केजरीवाल त्याच कार्स वापरतात.

Leave a Comment