खालच्या बाजूने का उघडे असतात परदेशातील शौचालयाचे दरवाजे ?


जगभरात मागील महिन्यात टॉयलेट डे साजरा करण्यात आला. याचदरम्यान सर्वत्र भारतात सुरु असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची कौतुक केले जात आहे. सरकारने भारतातील मागास भागातही शौचालय तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरामध्ये कार्यालय अथवा मॉलमध्ये तुम्ही कधी ना कधी सार्वजनिक शौचालयाचा वापर केला असेल. पण हे तुम्हाला माहिती आहे का, या शौचालयाचे दरवाजे खालून उघडे का असतात?

सार्वजनिक शौचालयचा वापर काहीजण सेक्स करण्यासाठी करतात. त्यामुळे या घटनांवर रोख लावण्यासाठी शौचालयाचा दरवाजा खालून उघडा ठेवतात.

लहान मुले बहुतांश वेळा शौचालयमध्ये अनावधानाने स्वत:ला कोंडून घेतात. तेथून त्यांना सहजासहजी काढता येण्यासाठी दरवाजा खालच्या बाजूने उघडा ठेवण्यात येतो.

एखादा व्यक्ती शौचालयमध्ये बेशुद्ध पडल्यास इमर्जन्सीमध्ये त्याला काढण्यासाठी सोयीचे जावे यासाठीही शौचालयचा दरवाजा खालच्या बाजूने मोकळा असतो.

सार्वजनिक शौचालयमध्ये जाऊन काहीजण दारु व सिगारेट पितात. त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यासाठी दरवाजा खालच्या बाजूने खुले ठेवतात.

Leave a Comment