Video : विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाने विचित्र पद्धतीने साजरा केला आनंद

विकेट घेतल्यानंतर गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करत असतात. अनेकदा ही पद्धत एवढी विचित्र असती की पाहिल्यावर हसूच रोखता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. एका गोलंदाजाने विकेट घेतल्यावर काहीशा वेगळ्या अंदाजात आनंद साजरा केला व लोक स्वतःचे हसू रोखू शकले नाहीत.

टिकटॉकवर एका गोलंदाजाचा विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ‘गर्मी’ हे गाणे देखील जोडले आहे. हा व्हिडीओ 29 जानेवारीला पार पडलेल्या प्रोव्हिनशियल कपमधील नॉर्दर्न्स कपमधील नॉर्दर्न्स आणि बॉर्डर यांच्यामधील आहे. मात्र टिकटॉकवर आता व्हायरल होत आहे.

@jr.shreyasbaikar_hayy garmi 💯 #cricket #lol♬ original sound – jr.shreyasbaikar_060

या सामन्यात नॉर्दर्न्सचा गोलंदाज रिवाल्डो मूनसामीने फलंदाज नोनलेला यिखाला बाद केल्यानंतर मूनसामी जमिनीवर पडून एखादे कासव चालत असल्यासारखा आनंद साजरा करू लागला. मूनसामीचे हे सेलिब्रेश बघून इतर खेळाडू देखील हसू लागले.

Leave a Comment