या नाइट क्लबमध्ये चक्क संस्कृत गाण्यावर थिरकतात लोक

भारतात सर्वसाधारणपणे नाइट क्लबमध्ये हिंदी, पंजाबी अथवा इंग्रजी गाणी वाजवली जातात. मात्र एक देश असा आहे, जेथे चक्क संस्कृत गाण्यावर लोक थिरकतात.

या देशाचे नाव अर्जेंटिना असून, येथील ब्यूनस-आयर्समधील ग्रोव नावाच्या नाइट क्लबमध्ये चक्क गणेश शरणम, गोविंदा-गोविंदा, जय-जय राधा रमन हरी बोल आणि जय कृष्णा सारखी गाणी वाजवली जातात.

हा नाइट क्लब काही छोटा-मोठा नाइट क्लब नसून, येथे एकावेळी जवळपास 800 लोक डान्स करू शकतात. एक भारतीय राजनयिक विश्वनाथन 2012 मध्ये अर्जेंटिना येथे गेले होते. त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांनी सांगितले होते की, या क्लबमध्ये दारू देखील मिळत नाही व लोक धुम्रपान करताना देखील दिसत नाहीत.

येथे ड्रग्स आणि मांस-मासे देखील मिळत नाही. येथे केवळ सॉफ्ट ड्रिंग्स, फळांचा ज्यूस आणि शाकाहारी जेवण मिळते.

Leave a Comment