या गावात तळीरामांना चक्क पिंजऱ्यात केले जाते बंद

गुजरात राज्यात दारूबंदी आहे. मात्र तरी देखील यावर अनेकदा प्रश्न निर्माण होत असतात. आता अहमदाबादच्या साणंद येथील मोतीपुरा गावातील गावकऱ्यांनी अशा तळीरामांना धडा शिकवण्यासाठी ही हटके पद्धत शोधली आहे.

मोतीपुरा गावातील गावकऱ्यांनी दारू पिणाऱ्यांसाठी एक खास पिंजऱ्यासारखी जेल बनवली आहे. नशेत आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या पिंजऱ्यात बंद केले जाते. 24 तास ती व्यक्ती पिंजऱ्यात बंद असते. त्यानंतर त्याचे कुटुंब 1200 रुपये दंड भरून त्याची पिंजऱ्यातून सुटका करतात.

पिंजऱ्याची ही सुरूवात 3 वर्षांपुर्वी झाली. मागील 2 वर्षात ही पद्धत चांगलीच यशस्वी ठरली आहे. मागील 2 वर्षात एकही प्रकरण समोर आलेले नाही. एकवेळी अशी होती की या गावात दारू पिऊन लोक गावभर भिरत. यामुळे 5 वाजल्यानंतर दुसऱ्या गावातील लोक येथे येत नसे.

सरपंच बाबूभाई नायक यांनी सांगितले की, तीनवेळा पकडल्यास बहिष्कार सारखी शिक्षा देखील होती. मात्र तशी कधी परिस्थितीच आली नाही.

Leave a Comment