टेलिग्रामचे हे नवीन फिचर्स व्हॉट्सअ‍ॅपसाठी ठरणार डोकेदुखी

काही दिवसांपुर्वी मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्रामचे सीईओ पाव्हेल ड्रुरोव्ह यांनी व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित नसून, युजर्सला टेलिग्रामचा वापर करण्यास सांगितले होते. आता टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी अनेक खास फीचर्स लाँच केले आहेत.

टेलिग्रामनने 5.15 अपडेट जारी केले असून, यामध्ये युजर्सला फास्ट मीडिया व्ह्यूवर, अपडेटेड प्रोफाईल पेजेस आणि पिपल निअरबाय 2.0 सारखे फीचर्स दिले आहेत. यामुळे युजर्सचा मेसेजिंग अनुभव आधीपेक्षा अधिक चांगला बनणार आहे.

फास्ट मीडिया व्हूयवर – या फीचरच्या मदतीने युजर्स मीडिया फाइल्सला स्क्रीनच्या उजव्या अथवा डाव्या बाजूला स्क्रॉल करू शकतात. या फीचर्सचा उपयोग केवळ अ‍ॅपच्या ऑल मीडिया सेक्शन्समध्येच करता येईल.

अपडेटेड प्रोफाईल पेजेस – या फीचरमध्ये प्रोफाईल पेजला नवीन डिझाईन देण्यात आलेले आहे. अपडेटनंतर युजर्स स्क्रॉल करून सहज आपल्या कॉन्टॅक्टमधील युजर्सचे प्रोफाईल पिक्चर पाहू शकतील. यात आधीच्या तुलनेत अधिक फंक्शन्स देण्यात आलेले आहेत. युजर्सला फोटो, व्हिडीओ आणि लिंक सहज पाहता व शेअर करता येईल.

पिपल निअरबाय 2.0 – या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे युजर्स सहज एकमेंकामध्ये कॉन्टॅक्ट इंफॉर्मेशन शेअर करू शकतात. याच्या मदतीने नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट्सवर टॅप करावे लागेल. त्यानंतर People Nearby वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व अ‍ॅक्टिव युजर्सची नावे दिसतील.

Leave a Comment