यामुळे शापित हॉटेलमध्ये आजपर्यंत राहिलेली नाही एकही व्यक्ती

उत्तर कोरिया हा देश तसा तर आपले विचित्र कायदे आणि क्षेपणास्त्र परिक्षणासाठी जगभरात ओळखला जातो. मात्र या व्यतरिक्त देखील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना हैराण करतात. अशीच एक गोष्ट म्हणजे राजधानी प्योंगयोंगमधील पिरामिड सारख्या आकाराची एक गगनचुंबी इमारत. या इमारतीचे नाव ‘रयुगयोंग’ असे आहे. मात्र याला ‘यू-क्यूंग’ नावाने देखील ओळखले जाते. ही इमारत एक हॉटेल आहे.

330 मीटर उंच या हॉटेलमध्ये 3000 पेक्षा अधिक खोल्या आहेत. तर ही इमारत 105 मजली आहे. मात्र आजपर्यंत एकही व्यक्ती येथे राहिलेला नाही. बाहेरून शानदार दिसणाऱ्या या हॉटेलला शापित आणि भूताचे हॉटेल देखील म्हटले जाते. काही वर्षांपुर्वी अमेरिकन मॅग्झिन ईस्क्वायरने या हॉटेलला ‘मानवी इतिहासातील सर्वात खराब इमारत’ संबोधले होते.

Image Credited – Amarujala

उत्तर कोरियाने या हॉटेलवर एकूण 750 मिलियन डॉलर (जवळपास 47 अब्ज रुपये) खर्च केले आहेत. ही रक्कम उत्तर कोरियाच्या जीडीपीच्या 2 टक्के आहे. मात्र तरी देखील आजपर्यंत हे हॉटेल सुरू झालेले नाही.

Image Credited – Amarujala

हे हॉटेल जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून बनविण्यात येत होते. मात्र आता याची एक वेगळीच ओळख झाली आहे. या हॉटेलची नोंद गिनीज बुकमध्ये देखील आहे. जर निश्चित वेळेत या इमारतीचे काम पुर्ण झाले असते, तर ही जगातील सातवी सर्वात उंच इमारत आणि जगातील सर्वात उंच हॉटेल ठरले असते.

Image Credited – Amarujala

या इमारतीचे काम 1987 मध्ये सुरू झाले होते. मात्र अनेक कारणांमुळे याचे काम पुर्ण झाले नाही. अखेर 1992 मध्ये देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने याचे काम थांबविण्यात आले.

Image Credited – Amarujala

2008 मध्ये याचे काम पुन्हा सुरू झाले. या इमारतीला व्यवस्थित करण्यासाठी 11 अब्ज रुपये खर्च झाले. त्यानंतर या इमारतीला काचेचे पॅनेल लावण्यात आले. उत्तर कोरियाने या हॉटेलचे काम 2012 पर्यंत सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र आजपर्यंत या हॉटेलचे काम पुर्ण झालेले नाही.

Leave a Comment