या रिक्षाचालकाच्या मुलीला मोदींनी पत्र पाठवून दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

वाराणसीमध्ये रिक्षा चालवणारे मंगल केवट आणि त्यांच्या कुटुंबातील लोक सध्या खूप खुष आहेत. याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे नुकतेच त्यांच्या मुलीचा विवाह पार पडला आहे व दुसरे म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलीला लग्नासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत. मोदींनी त्यांच्या मुलीला आशिर्वाद दिला व नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

मंगल केवट हे पंतप्रधान मोदींचे संसदीय क्षेत्र असलेल्या डोमरी या गावात राहतात. त्यांच्या मुलीचे लग्न 8 फेब्रुवारीला होते. त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे पहिली पत्रिका दिल्लीला येऊन पीएमओला दिली होती. यानंतर मोदींनी त्यांच्या मुलीला शुभेच्छा देणारे पत्र पाठवले होते.

8 फेब्रुवारीला पंतप्रधानांचे पत्र केवट यांना मिळाले. 16 फेब्रुवारीला मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत, त्यानिमित्ताने केवट यांनी त्यांना भेटायची इच्छा असल्याचे देखील सांगितले.

Leave a Comment