प्रपोज करण्यासाठी या पठ्ठ्याने चक्क आकाशात पाठवली अंगठी

आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी लोक वेगवेळ्या पद्धती शोधत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी चक्क अंगठी आकाशात पाठवली.

अमेरिकेतील एअर फोर्स पायलट स्टुअर्ट शिप्पी गर्लफ्रेंड मॅरी लिस्मनला प्रपोज करण्यासाठी एका खास फुग्याद्वारे अंगठी आकाशात पाठवतो.  90 हजार फुट प्रवास केल्यानंतर फुगा आकाशात फुटतो व पुन्हा पृथ्वीवर येतो.

स्टुअर्ट शिप्पी अमेरिकेच्या मिसूरी येथील आहे. स्टुअर्टने आपल्या काही मित्रांबरोबर मिळून अंगठी आकाशात पाठवण्याची योजना बनवली होती. यासाठी त्यांनी एका मॉडेल रिंगचा वापर केला. यासाठी ज्या फुग्याचा वापर करण्यात आला, त्यात कॅमेरा लावलेला होता. त्यामुळे अंगठीचा पुर्ण प्रवास त्यात कैद झाला.

अंगठी आकाशात पाठवण्यापुर्वी त्याने अनेकदा नाणी आकाशात पाठवून चाचणी देखील केली होती.

स्टुअर्टने सांगितले की, त्याला विश्वास नव्हता की हे यशस्वी होईल. थोडेही काही चुकीचे झाले असते तर संपुर्ण योजनेवर पाणी पसरले असते. जेव्हा फुगा फुटल्यानंतर अंगठी आकाशात परतली. त्यावेळी जीपीएसच्या मदतीने अंगठीला शोधण्यात आले. जेव्ही मॅरी आकाशातून पडलेली अंगठी पाहत असते, त्याचवेळी स्टुअर्ट खरी अंगठी बाहेर काढून तिला लग्नाची मागणी घालतो. या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment