या संस्थेने जारी केले कोविड-19 चे नवीन फोटो


मोंटाना- कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 चे नवीन फोटो अमेरिकेतील मोंटाना येथे असलेल्या “द नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इंफेक्शियस डिसीजेस’ने जारी केले आहेत. स्कॅनिंग आणि ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिकमधून हे फोटो घेण्यात आले आहेत. अद्याप याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. फक्त चीनमध्ये कोरोनामुळे 67535 आपल्या विळख्यात घेतले आहे तर यामुळे आतापर्यंत 1600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनवरुन भारतात आलेल्या सर्व प्रवाशांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसने संक्रमित झालेल्या मेडिकल वर्कर्सचा आकडा चीनने शुक्रवारी पहिल्यांदा जाहीर केला. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत 1716 मेडिकल वर्कर रुग्णांवर उपचार करताना व्हायरसने संक्रमित झाले आहेत. तसेच, या व्हायरसमुळे आतापर्यंत 6 डॉक्टर्सचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या (कोविड-19)विळख्यातून बचावलेल्या रुग्णांमधून चीनी वैज्ञानिकांनी प्रोटो प्लाजा जैविक तत्व विकसित केला आहे. याच्या मदतीने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. याला चाइना नॅशनल बायोटेक ग्रुप कंपनीच्या वैज्ञानिकांनी विकसित केले. याचा वापर कन्वलसेंट प्लाज्मा आणि इम्युनोग्लोबिनला बनवण्यासाठी केला जाईल.

Leave a Comment