बहुगुणी शेंगदाणे


पूर्वी सिनेमा बघायला गेल्यानंतर किंवा बागेमध्ये फिरायला गेल्यानंतर टाइमपास म्हणून शेंगदाण्याची पुडी आपण आवर्जून घेत असू. पण शेंगदाणे हा केवळ टाइमपास नसून आरोग्याचे भांडार आहे हा विचार आपण कधी फारसा करीत नाही. प्रथिने, शरीराला आवश्यक असलेले फॅट्स आणि इतर पोषक तत्वे शेंगदाण्यांमध्ये भरपूर मात्रेमध्ये आहेत. दररोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होते, व वजन घटण्यासही मदत होते.

अमेरिकेतील ‘नॅशनल इंस्टीट्युट ऑफ अॅलर्जीज् अँड इंफेक्शीयस डिसीझेस’ या संस्थेने केलेल्या रिसर्च नुसार जर लहान मुलांच्या आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश केला तर पुढील आयुष्यामध्ये त्यांना निरनिराळ्या अॅलर्जीज् होण्याची शक्यता कमी होते. शेंगदाण्यांमध्ये मुबलक मात्रेमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्यक फॅट्स असतातच, पण त्याशिवाय यामध्ये लोह, कॅल्शियम, आणि झिंक ही पोषक द्रव्येही आहेत. याशिवाय यामध्ये ई आणि बी६ ही जीवनसत्वेही आहेत.

शेंगदाण्यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मॅग्नेशियम, नियासिन, कॉपर, ऑलीअॅक अॅसिड आणि अँटी ऑक्सिडंट्स आहेत. या अंधे असलेल्या कॅल्शियम मुळे दाताचे आणि हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. गर्भारशी महिलांकरिता शेंगदाण्याचे सेवन लाभकारी आहे. शेंगदाण्याच्या सेवनाने पोटातील बाळामध्ये न्यूरल ट्यूब डीफेक्टस् उद्भविण्याची संभावना कमी होते. शेंगदाण्याच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे थंडीच्या सेवनाने शेंगदाण्याचे सेवन शरीराला लाभदायी ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment