बोल्टचा विक्रम तोडणाऱ्या भारतीय व्यक्तीची क्रिडा मंत्रालय घेणार चाचणी

कर्नाटक येथील पारंपारिक म्हशीच्या शर्यतीमध्ये श्रीनिवास गौडा या व्यक्तीने विक्रमी वेळेत अंतर पार केल्यानंतर त्याची तुलना जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टशी होत आहे. श्रीनिवासने मंगलौर येथे म्हशीच्या शर्यती दरम्यान अवघ्या 13.62 सेंकदात 142.5 मीटर अंतर धावून पुर्ण केले. या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासने उसेन बोल्ट पेक्षाही कमी वेळेत अंतर पार केले आहे.

यावर बोलताना श्रीनिवास म्हणाला की, लोक माझी तुलना उसेन बोल्टशी करत आहेत. तो एक विश्वविजेता आहे. मी धान्याच्या शेतात धावतो.

उसेन बोल्ट सध्या जगातील सर्वात वेगवान धावपटू असून, त्याने 100 मीटर अंतर अवघ्या 9.58 सेंकदात पार करण्याचा विक्रम केला आहे.

श्रीनिवास कंबाला या स्पर्धेत चिखलाने भरलेल्या शेतात दोन म्हशीसोबत धावताना दिसतात. ही स्पर्धा कर्नाटकात दरवर्षी आयोजित केली जाते. ही स्पर्धा दक्षिण कन्नड आणि उड्डुपी येथील तटीय जिल्ह्यात भरवली जाते. प्रतिस्पर्धींना 132 मीटर ते 142 मीटर हे चिखलाने भरलेले अंतर म्हशीच्या जोडीसोबत धावत पार करायचे असते.

कर्नाटकच्या मुदाबिद्री येथील गौडाला आता क्रिडा मंत्रालयाने देखील चाचणीसाठी बोलवले आहे. या संदर्भात केंद्रीय क्रिडामंत्री किरण रीजेजू यांनी देखील ट्विट करत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियातील अव्वल प्रशिक्षकांमार्फत श्रीनिवासची चाचणी घेतली जाईल. श्रीनिवाससाठी रेल्वे तिकिटाची देखील सोय करण्यात आलेली आहे.

Leave a Comment