गुगलच्या या टिप्स करतील ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव

इंटरनेटचा वापर आता केवळ ईमेल पाठवून आणि सोशल मीडियापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. आता इंटरनेटचा वापर कोणतेही तिकीट बुक करण्यापासून ते ऑनलाईन व्यवहारासाठी होतो. पैशांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाईन होत असल्याने, याचे धोके देखील वाढले आहेत. त्यामुळे आपला डेटा सुरक्षित ठेवणे व खाजगी माहिती लीक होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी गुगलने आठ उपाय सुचवले आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

मोबाईल नंबर / ईमेल –

तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल तुमच्या खात्याशी जोडणे आवश्यक आहे. यामुळे कोणतीही दुसरी व्यक्त जर तुमच्या खात्यातून पैसे काढण्याचा अथवा तुमचे डिव्हाईस हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्हाला त्वरित मोबाईल नंबर आणि ईमेलवर अलर्ट येईल.

Image Credited – Amarujala

पासवर्ड मॅनेजर –

गुगलनुसार, एक व्यक्ती सरासरी 120 पेक्षा अधिक पासवर्ड मॅनेज करण्यास त्रास होतो. अनेकदा पासवर्ड रीसेट करावा लागतो. त्यामुळे पासवर्ड मॅनेजरची मदत घेता येते. पासवर्ड मॅनेजर मजबूत पासवर्ड सुचविण्यासोबतच पासवर्ड लक्षात ठेवण्यास देखील मदत होते.

Image Credited – Amarujala

सॉफ्टवेअर अपडेट –

अनेकदा मोबाईल अथवा लॅपटॉप सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी नॉटिफिकेशन येतात. मात्र आपण वेळोवेळी अपडेट करत नाही. असे केल्याने व्हायरस अथवा ऑनलाईन धोका निर्माण होतो. म्हणून वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करणे गरजेचे आहे.

Image Credited – Amarujala

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन –

डिजिटल जगात टू फॅक्टर ऑथेंटिकेशन महत्त्वाचे आहे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू केल्यानंतर तुम्ही कोणत्याही नवीन डिव्हाईसवर लॉगइन करताना तुम्हाला मोबाईल नंबरवर कोड येतो. हा कोड टाकल्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकता.

Image Credited – Amarujala

सिक्युरिटी चेकअप टूल –

गुगलच्या सिक्युरिटी चेकअप टूलचा वापर करून तुम्ही पासवर्ड हॅक झाला आहे की नाही याची माहिती मिळवू शकता. हे तुम्हाला साइन-इन करण्यात आलेले डिव्हाईस, सुरक्षा इव्हेंट, रिपीट पासवर्ड या सर्व गोष्टींची माहिती देते.

Image Credited – Amarujala

थर्ड पार्टी अ‍ॅप इंस्टॉल –

थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोरवरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करू नये. यामुळे डेटा लीकचा धोका असतो.

Image Credited – The Ladders

लॉग आउट –

अनेकदा सोशल मीडिया अकाउंट, ईमेल वापरत नसलो तर अनेक दिवस लॉग आउट करत नाही. लॉग आउट नसल्यास अनेकदा अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते.

Leave a Comment