जिचे प्राण वाचवले तिलाच 11 वर्षीय मुलीने दिली वीरता पुरस्कारची रक्कम

मिझोरमची 11 वर्षीय कॅरोलिन मालस्वामटलुआंगी हिला एका 7 वर्षीय मुलीचे प्राण वाचवण्यासाठी यंदाच्या वर्षी वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कॅरोलिन केवळ बहादूरच नाही तर सह्रदय देखील आहे.

तिने वीरता पुरस्काराची आर्धी रक्कम त्याच 7 वर्षीय मुलीला दिला आहे. जिला तिने वाचवले. कॅरोलिनने 7 वर्षीय मुलीला 10 हजार रुपये, चांदीचा हार आणि दिल्लीवरून आणलेले कपडे दिले.

कॅरोलिनची आई लालसांगझेली यांनी सांगितले की, जेव्हा तिला मुलीच्या आर्थिक स्थितीबद्दल समजले, त्यावेळी तिने तिची मदत करण्याचा निर्णय घेतला.

मागील वर्षी जूनमध्ये कॅरोलिन आपल्या घराच्या येथे खेळत असताना एक अनोळखी लहान मुलगी देखील त्यांच्यासोबत खेळू लागली. त्या लहानमुलीचे अपहरण करण्यात आल्याचे नंतर समजले. यानंतर कॅरोलिन स्वतः त्या मुलीचा शोध घेऊ लागली. ही मुलगी जोनुनसांगिन फनाईच्या (31) घरी होती. संधी मिळाल्यावर कॅरोलिनने त्वरित त्या मुलीला आपल्या पाठीवर घेतले व आपल्या घराच्या दिशेने पळाली. यानंतर कॅरोलिनच्या पालकांनी पोलिसांना याबाबत सुचना दिली व आरोपी महिलेला अटक करण्यात आले.

Leave a Comment