आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर होणार धोनीचे पुनरागमन


मुंबई – जुलै २०१९ नंतर एकही सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळलेला नाही. मैदानात त्याचे कधी पुनरागमन होणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. ही उत्सुकता आता संपली असून रोहित शर्माच्या विरोधात धोनी मैदानात उतरणार असल्याचे आता नक्की झाले आहे.

शनिवारी आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात धोनी चेन्नई संघाचा कर्णधार म्हणून तब्बल आठ महिन्यांनी मैदानात उतरणार आहे.

आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यानंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. तो क्रिकेटपासून लांब आहे. २९ मार्च ते १७ मे यादरम्यान आयपीएलचा १३ वा हंगाम खेळला जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, मिचेल सॅन्टनर, मोनू कुमार, करन शर्मा, सॅम करन, नारायणन जगदीसन, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेजलवूड, आर साई किशोर.

Leave a Comment