कोरोना : नोटांद्वारे संसर्ग होऊ नये म्हणून चीनचा रामबाण उपाय

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आतापर्यंत दीड हजारांपेक्षा अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 65 हजारांपेक्षा अधिक जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.

चीनच्या सरकारने ज्या ज्या गोष्टींपासून या व्हायरसचा संसर्ग होत आहे, त्यावर नियंत्रण आणण्यास सुरूवात केली आहे. चीनमध्ये संसर्ग असणाऱ्या स्थानावरून रोख रक्कम जमा करून गोदामांमध्ये ठेवली जात आहे. चीनच्या सरकारला शंका आहे की नोटांद्वारे देखील संसर्ग होत आहे. अधिकाऱ्यांनुसार येथे काही दिवसांपुर्वीच 4 हजार कोटी युआन मुद्रा बाजारात आणण्यात आल्या होत्या. त्यामुळे या नोटांना स्पर्श झाल्यामुळे याद्वारे संसर्ग होऊ नये याची काळजी चीन सरकार घेत आहे.

हुबेईच्या आरोग्य अधिकाऱ्यांनुसार जवळपास अर्ध्या लोकांवरील उपचार पारंपारिक चिकित्सा पद्धतीने केला जात आहे.

चीनमध्ये घरात बंद असलेले लोक देखील या आजारापासून वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत. हाँगकाँगच्या पान सांकू नावाच्या व्यक्तीने स्वतःच्याच घरात पावणे सात तास 66 किमी धावण्याची कामगिरी केली आहे.

Leave a Comment