देशात पहिल्यांदाच डोंगरावरून 100 किमी वेगाने धावणार रेल्वे

भारतातील रेल्वे नेटवर्क विस्तारित असले तरी आजपर्यंत डोंगरावरून नॅरोगेज अथवा मीटरगॅजवरच रेल्वे चालवली जाते. डोंगरावरून खूप कमी वेगाने रेल्वे चालवली जाते. मात्र आता पुढील 5 वर्षात डोंगरावरून देखील ताशी 100 किमी वेगाने रेल्वे धावताना दिसणार आहे.

पंजाबच्या भानुपली ते हिमाचलच्या बिलासपूरपर्यंत 63 किमीचा पहिला ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक आहे.   दुसरा ट्रॅक उत्तराखंडच्या ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंत आहे. या दोन्ही ट्रॅकचे वेगाने काम सुरू असून, हिमाचलच्या ट्रॅकला 2025 आणि उत्तराखंडचा ट्रॅक वर्ष 2024 पर्यंत पुर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

दोन्ही ट्रॅक महत्त्वाचे असून, यामुळे सैन्यांना सीमेपर्यंत पोहचण्यासाठी मदत होईल. बिसासपूर-भानूपली रेल्वे ट्रॅक भविष्यात लेहपर्यंत नेण्याचा विचार आहे. ज्यासाठी जिओग्राफिकल सर्वेक्षण सुरू झाले आहे. तसेच उत्तराखंडच्या चमोलीमध्ये सैन्य चीन-तिबेट बॉर्डरपर्यंत पोहचू शकेल.

ऋषिकेश ते कर्णप्रयागपर्यंतचा ट्रॅक धार्मिक उद्देश समोर ठेऊन देखील बनवला जात आहे. या ट्रॅकमध्ये 4 धामांची यात्रा करणे सोपे जाईल. दोन्ही प्रोजेक्टवर भारतीय रेल्वे विकाम महामंडळ काम करत आहे.

ऋषिकेश ते कर्णप्रयाग रेल्वे ट्रॅकची घोषणा 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तेव्हापासून साडे पाच किमी रेल्वे मार्ग आणि योग नगरी ऋषिकेश रेल्वे स्टेशनचे काम 80 टक्के पुर्ण झाले आहे.  ट्रॅक तयार झाल्यानंतर ऋषिकेश ते कर्णप्रयागमधील अंतर 7 तासांवरून थेट 2 तास होईल.

भानुपली-बिलासपूर ट्रॅकच्या या 65 किमी प्रोजेक्टची घोषणा 2008 साली झाली होती. मात्र काम 2019 पासून सुरू झाले आहे. या ब्रॉडबॅज ट्रॅकचा जवळपास 25 किमी भाग बोगद्यातून जाईल. हा प्रोजेक्ट 2025 पर्यंत पुर्ण होईल. ही रेल्वेलाईन लेहपर्यंत देखील जाणार आहे.

Leave a Comment