ज्या कामामुळे चिडत होती प्रेयसी; त्याच कामातून लाखो कमावत आहे हा तरुण


प्रत्येकासाठी आपल्या मनासारखे काम मिळणे खूप अवघड आहे. बरेच लोक पैसा कमवण्याच्या नादात आपली इच्छा मारून टाकतात, पण मनासारखे काम मिळून त्यातून रग्गड पैसा मिळाला तर काय म्हणाल. असेच काही टॉम एक्सटन या युवकासोबत झाले आणि त्याच्या आवडीने त्याला लखपती बनविले. टॉम लक्झरी आणि सुपरकार्सची टेस्ट ड्रायव्हिंग लाखो कमावतो. असे पाहिले जाते की लक्झरी कार मुलींना खूप आकर्षित करतात. पण टॉमच्या प्रेयसीला त्याच्या कामा प्रति तीव्र तिरस्कार आहे. टेस्ट ड्राइव्हमधून लाखो रुपये कसे मिळवायचे ते आता आपण जाणून घेऊया….

लहानपणापासूनच टॉमला कारबाबत आकर्षण होते. तो गाड्या बघत विचार करायचा की यात असे काय आहे जे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याला केवळ कारबद्दल पूर्ण संशोधन करण्यामध्येच रस होता. टॉम युट्यूबवर असून, त्याने त्याची सुरुवात ब्लॉग लिहून केली. तो कारबद्दल ब्लॉग लिहितो. त्याचबरोबर तो सोशल मिडियावरही आपली प्रतिक्रिया शेअर करतो. तो आपला कार बद्दलचा रिव्ह्यू युट्युबवर देखील अपलोड करत होता. बघता बघता त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढत गेली आणि काही महिन्यातच तो प्रसिद्ध झाला. त्याने दिलेले रिव्ह्यू ९९ टक्के खरे असतात.

त्याने अपलोड केलेला व्हिडीओ युट्युबवर हमखास हिट होतो. या व्हिडीओद्वारे तो कमाई देखील करतो. एवढेच नाही तर त्याने लम्बोर्घिनी, पोर्श, पगनी आणि रेंज रोव्हरचे देखील रिव्ह्यू लिहिले आहेत. ज्यांना लोकांनी भरपूर पसंत केले आहे. आपल्या युट्युब चॅनलच्या सदस्यत्वाच्या माध्यमातून त्याची कमाई वाढत गेली. त्याला सोशल मीडियावर अनेक प्रायोजकही मिळतात. अशा प्रकारे तो दरमहा ७ लाख रुपये कमावतो.

तो इंस्टाग्रामवर आपले सुपरकार्ससोबतचे आपले फोटो देखील अपलोड करत असतो. त्याला देखील लोकांची खूप पसंती मिळत आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १ लाख ४५ हजार फॉलोअर्स आहेत. तर युट्युबवर त्याचे ८२ हजार ८६५ सदस्य आहेत, ज्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच सदस्यांच्या माध्यमातून महिन्याला लाखोची कमाई करत आहे.

टॉमच्या सुपरकार प्रेमामुळे त्याची प्रेयसी खूप रागवत असते. तिला मोठया आवाजाच्या गाड्या अजिबात आवडत नाही. टॉम सांगतो की प्रत्येक मुलगी सुपर कार पाहून प्रभावित होते हे सांगणे चुकीचे आहे कारण माझ्या मैत्रिणीला या गोष्टीमुळे खूप राग येतो. तिला माझे काम काम आवडत नाही. पण मला माझे काम खूप आवडते.

Leave a Comment