का असतो कोलकाता पोलिसांचा गणवेश पांढरा ?


खाकी रंगाची वर्दी भारतातील बहुतांश पोलिसांना आहे. पण कोलकात्याला तुम्ही गेल्यास तुम्हाला रस्त्यावर पांढऱ्या पोषाखातील पोलिस दिसतील. कधी तुम्ही विचार केला आहे का? की खाकी वर्दी देशभरातील पोलिस घालतात. पण कोलकाता पोलिस पांढरा गणवेश का परिधान करतात‌?

उगाचच कोलकाता पोलिसांचा पांढरा गणवेश दिलेला नाही. त्यामागे विशेष कारण आहे. इंग्रज राजवटीचा यामागे हात आहे. १८४५मध्ये कोलकाता पोलिसांची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर इंग्रज निघून गेले. पण ते कोलकाता पोलिसांसाठी पांढरा गणवेश सोडून गेले. दरम्यान, इंग्रजांनी पांढरा गणवेश समुद्र जवळ असल्याने निवडला होता. ज्यामुळे सुर्याच्या प्रखर उन्हामुळे त्यांना त्रास होणार नाही.

Leave a Comment