या व्यक्तीला एका नाण्याने बनविले लखपती, जाणून घ्या काय आहे किंमत


पूर्वी अनेक लोक खजिना लपविण्यासाठी जमिनीखाली खड्डा खोदुन त्यात खजिना लपवून ठेवत असत आणि राजा आपला खजिना जमिनी खाली गाडून ठेवत असत हे आपण आपल्या आजी-आजोबांच्या गोष्टीतून ऐकलेच असेल. ही गोष्ट नेहमी एका ब्रिटिश व्यक्तीच्या मनात चालूच होती. त्याने याबाबत अनेक कथा ऐकल्या होत्या. बरेच लोक १५०० वर्षापूर्वी एका राजाने एका ठिकाणी खजिना गाडून ठेवले असल्याचे बोलत होते. ते ठिकाण त्याच्या घराजवळ होते. मग काय या व्यक्तीने खजिना शोधण्यासाठी खोदाई सुरु केली.

यूके शहरातील चेम्सफोर्ड येथे राहणारा ख्रिस कटलरला काही दिवसांपूर्वीच माहीत पडले होते की १५०० वर्षांपूर्वी एंजेलो सॅक्सनने शेतात खजिना गाडून ठेवला आहे. तो अनेक दिवसांपासून त्या खजिनाचा शोधत घेत होता. मग तो एका जागी खणण्यासाठी तयार झाला. चार दिवसांत त्याने १६०० स्क्वेअर मीटरपर्यंत खोदल्यानंतर तो थकून बसला होता. त्यानंतर त्याला एक चमकणारी गोष्ट पाहिली. त्यानंतर त्याने जे पाहिले त्यामुळे तो हैराण झाला.

ख्रिसने आधी विचार केला की हा दगड आहे. पण साफसफाईनंतर ते एक सोन्याचे नाणे निघाले. त्यानंतर त्याने अधिक खणले पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. पण ख्रिस हे माहीत होते की हे एक नाणे फार महाग आहे. नाणे मिळाल्यानंतर त्याने ब्रिटिश संग्रहालय गाठले. तपासणी केल्यानंतर असे समोर आले की हे नाणे १५०० वर्षे जुने असून ते ऍंग्लो-सॅक्सनच्या काळातील आहे.

डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार क्रिस बराच काळ या नाण्यांचा शोध घेत होता. त्याने कितीतरी वेळा खोदाई केली आणि निराश झाला होता. पण अखेरपर्यंत त्याला यश मिळाले. आता अशा गोष्टींबद्दल माहिती मिळवणार आणि पुन्हा खोदकाम सुरु करणार आहे. ब्रिटिश म्युझियमच्या मते, या नाण्याचे भाव सुमारे १३ हजार डॉलर्स (भारतीय चलनानुसार ८,५०,000 लाख रुपये) सांगण्यात आली आहे.

Leave a Comment