उदयनराजेंसाठी कापले संजय काकडेंचे तिकीट ? महाआघाडीची भाजपवर टीका


पुणे : राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपवर खासदार संजय काकडेंचे राज्यसभेचे तिकीट कापण्यावरून चांगलेच तोंड सुख घेतले आहे. संजय काकडे यांचे भाजपने तिकीट उदयनराजे यांचं पूर्नवसन करण्यासाठी कापल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणाले आहेत. मात्र त्याचबरोबर काकडे यांच्यावर देखील तटकरे यांनी तोंड सुख घेतले आहे.

सुनील तटकरे यांनी यावर मत मांडताना संजय काकडे म्हणजे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि याच वाचाळवीरांना पायबंध घालण्यासाठीच भाजपने हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. अधिकार नसताना बोलण्यात संजय काकडे पटाईत असल्याचा घणाघत देखील सुनील तटकरे यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपवर शिवसेनेने देखील निशाणा साधला असून जो पर्यंत आहे तो पर्यंत वापरून घ्या, त्यानंतर फेकून द्या अशी भाजपची भूमिका असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Comment