बर्गर पेक्षा सामोसाच अधिक ‘हेल्दी‘


आजकालच्या धावत्या युगामध्ये आपले खानपानही पटकन तयार होईल, किंवा सहजी उपलब्ध होईल असेच असणे अपेक्षित असते. विशेषतः जे लोक बहुतेकवेळी बाहेरच जेवतात, त्यांच्यासाठी टा ही गोष्ट अत्यावश्यक बनून राहिली आहे. त्यामुळे बर्गर, हॉट डॉग्स, इत्यादी पदार्थांकडे आपसूकच मोर्चा वळतो, कारण हे पदार्थ सहज उपलब्ध असतात, आणि पोटभरीचे देखील असतात. पण, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंटने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये बर्गरपेक्षा सामोसा जास्त ‘ हेल्दी ‘ म्हणजेच आरोग्याला फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

सामोसा बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ताजे वापरले जाते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग, किंवा चव वाढविणारे कृत्रिम पदार्थ (अॅडीटिव्ह), प्रिझर्वेटीव्ह इत्यादी वापरले जात नाहीत. सामोसा मध्ये कॅलरीज जरी मोठ्या प्रमाणावर असल्या, तरी यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कोत्याही पदार्थांमध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश नाही. या मध्ये वापरल्या जाणाऱ्या मैदा, जिरे, उकडलेले बटाटे, मटार, मसाले, मीठ आणि तेल या पदार्थांपैकी कोणतेही पदार्थ कृत्रिम नाहीत.

पण आपण चवीने खात असलेल्या बर्गरमध्ये मात्र प्रिझर्वेटीव्ह, अॅसिडीटी रेग्युलेटर, इमल्सिफायर, ग्लुटेन, इत्यादी पदार्थ वापरले जातात. ह्या पदार्थांचे जास्त प्रमाणात केलेले सेवन आरोग्याला हितकारी नसल्याचे सीएसईच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सामोश्याप्रमाणे पोहे, उपमा, हे पदार्थ देखील मधल्या वेळच्या नाश्त्यासाठी नूडल्स पेक्षा उत्तम पर्याय आहेत.

ताजी फळे आणि पाणी वापरून बनविलेले ज्युसेस डबाबंद ज्यूस पेक्षा अधिक आरोग्यदायी आहेत. डबाबंद ज्यूस मध्ये ते टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रिझर्वेटीव्ह आणि साखरचा वापर केलेला असतो. त्यामुळे ते ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळे खाणे किंवा ताज्या फळांचा रस सेवन करणे कधीही चांगले. त्याचप्रमाणे प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाण्यापेक्षा कॅलरिज अधिक असलेले पण ताजे अन्नपदार्थ खावेत असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment