भारतात सामान्‍य वाटत असणाऱ्या ‘या’ कामांमुळे विदेशात होऊ शकतो तुरुंगवास


ज्‍या देशात जाल तेथील रितीरिवाजाप्रमाणे वागले पाहिजे अशा आशयाची म्हण इंग्रजीमध्‍ये आहे. त्‍यामुळे प्रवासी जेव्‍हा दुस-या देशात जातात तेव्‍हा त्‍यांना अनेक गोष्‍टींची काळजी घ्‍यावी लागते. कारण देशांप्रमाणे नियमही बदलत असतात.

कित्‍येकदा लोक भारतात सार्वजनिक ठिकाणी पादतात (फार्ट) करतात. अनेकांना यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अनेकजण याकडे दुर्लक्षच करतात. भारतात हे सामान्‍य आहे. पण संध्‍याकाळी ८ वाजेनंतर फ्लोरीडात सार्वजनिक ठिकाणी गॅस सोडणे बेकायदेशीर आहे. ते देखील गुरुवारी. ऐकून विचित्र वाटेल. पण हे खरे आहे.

ग्रीसमध्‍ये काही शहरात महिलांना हिल्‍स घालण्‍यास मनाई असून येथील मुल्‍यवान दगड यामुळे खराब होतात, असे येथील शासनाचे म्‍हणणे आहे.

रमजानच्‍या काळात सौदी अरेबियामध्‍ये कोणीही सार्वजनिक ठिकाणी काही खाताना आढल्‍यास त्‍याला तुरुंगात जावे लागू शकते. त्याचबरोबर सौदी अरेबियामध्‍ये दारु पिण्‍यास बंदी आहे. जर कोणी दारु पिताना आढळले तर त्‍याला कठोर शिक्षा सुनावली जाऊ शकते. व्‍हेलेन्‍टाईन डे पाकिस्‍तान आणि सौदी अरेबियामध्‍ये साजरा करण्‍यास बंदी आहे. त्याचबरोबर यासंबंधीच्‍या जाहीरात करण्यासही येथे बंदी आहे.

लाल सिग्‍नल लागल्‍याशिवाय रोड क्रॉस करणे अमेरिकेत बेकायदेशीर आहे. असा प्रयत्‍न कोणीही केल्‍यास त्‍याला तरुंगवासाची शिक्षा आहे. असा नियम भारतातही आहे. पण कोणीही याचे पालन करताना दिसत नाही.

रात्री १० नंतर स्विर्त्‍झलँडमध्‍ये फ्लश करण्‍यास मनाई आहे. नियमानूसार, आसपासच्‍या लोकांना यामुळे त्रास होतो.

एक नवा नियम २०१४मध्‍ये बुरुंडी येथे लागू करण्‍यात आला असून या नियमानूसार येथे गृप जॉगिंग करण्‍यास मनाई आहे.

मोठ्या आवाजात गाणे म्‍हणणे, शिटी वाजण्‍यास ओंटेरियोतील प्रट्रोलियामध्‍ये मनाई आहे. त्याचबरोबर या शहरात मोठ्याने ओरडण्‍यासही मनाई आहे.

डेन्‍मार्कमधील पालक आपल्‍या मुलाचे नाव ठेवू शकत नाही. ७००० नावे या देशातील सरकारने निर्धारित केले आहेत. जर या नावांव्यतिरिक्त कोणाला वेगळे नाव ठेवायचे असले तर आधी सरकारची परवानगी घ्‍यावी लागते.

Leave a Comment