बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यास धोकादायक


आपल्या आहारामध्ये बटाटा हा सर्वाधिक सेवन केला जाणारा आहे. तसेच इतर भाज्यांच्या जोडीने देखील बटाटा वापरला जात असतो. ‘ भाज्यांचा राजा ‘ समजला जाणारा हा बटाटा प्रत्येक घरामध्ये कधी भाजीच्या तर कधी रायते, पराठे, सामोसे अश्या निरनिराळ्या रूपात जवळ जवळ दररोजच खाल्ला जातो. पण बटाट्याचे अति प्रमाणात सेवन आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

बटाटा आणि तेल हे समीकरण वजन वाढविण्यास कारणीभूत ठरत असते. बटाट्यामध्ये स्टार्च ( कर्बोदके ) मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यातच हा बटाटा तेलामध्ये तळला गेला, की त्याने वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे बटाटा खायचा झाल्यास तळून न खाता उकडून किंवा ओव्हनमध्ये भाजून घेऊन खावा. बटाट्या ऐवजी रताळ्याचा उपयोग जास्त करावा.

बटाट्याच्या अतिसेवनाने शरीरामध्ये साखरचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी बटाट्याचे अधिक प्रमाणात सेवन करणे टाळावे. तसेच बटाट्याच्या अधिक सेवनाने टाईप – २ या प्रकारात मोडणारा मधुमेह होण्याची संभावना असते. एका शास्त्रीय अभ्यासानुसार सलग चार आठवडे बटाट्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाबाचा विकार होण्याची लक्षणे आढळली. त्यामुळे बटाट्याचे सेवन नियंत्रित ठेवावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment