सुरु असलेल्या वादानंतर इंदुरीकर महाराजांनी सोडले मौन


शिर्डी : आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर अद्यापही किर्तनकार इंदुरीकर महाराज ठाम असून मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात सम-विषम तारखेबाबत आपण केलेले वक्तव्य खरे असल्याचे इंदुरीकरांनी एका किर्तनात सांगितले आहे. त्याचबरोबर भागवत आणि ज्ञानेश्वरीतही हे सांगितल्याचा दावा इंदुरीकरांनी केला आहे. पण त्यांनी सोशल मीडियावर यावेळी चांगलेच तोंडसुख घेतले. आपल्याला संपवण्याचा विडा यू ट्यूबने उचलल्याचा आरोप त्यांनी केला. आपण आपल्याबाबत सुरू असलेल्या बातम्यांमुळे उद्विगन् झालो असून किर्तन सोडून आता शेती करण्याचा विचार असल्याचे इंदुरीकरांनी एका किर्तनात सांगितले.

समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी हे भाष्य भागवतात आणि ज्ञानेश्वरीतही खरे आहे. मी म्हणत आहे हे देखील खरे आहे. तरी लोक म्हणतात याला ठेऊन द्या. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो. आता आपली कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचा, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. आता नको, असे देखील इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. काड्या यूट्यूबवाले करतात. कॅमेरावाले मागे लागलेत. यूट्यूब चॅनेलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Leave a Comment