जगातील ‘या’ सर्वात सुंदर नर्सला भेटण्यासाठी आजारपणाचे सोंग करून येतात मुले


आजारपणात रुग्ण पहिल्यांदा डॉक्टरचा शोध घेतो. कारण त्यामुळे त्याच्यावर चांगले उपचार होतील. पण जर आपण एक सुंदर डॉक्टर असेल तर तो रुग्ण आजारी पडण्याचे कारण शोधत असतो. असाच काहीसा प्रकार ताइवानमध्ये पाहण्यात आला आहे. जेथे काही दिवसांत एका नर्सने इंटरनेटच्या विश्वात खळबळ उडवली आहे. या नर्सला जगातील सर्वात सुंदर नर्स म्हणूनही ओळखले जात आहे. सोशल मीडियावर या नर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सध्या फॉलोअर्स वाढत आहेत.

ताइवानमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय निंग चेनला आजही विश्वास वाटत नाही की तिला जगातील सर्वात सुंदर नर्स म्हटले जात आहे. ती एक दंत परिचारिका आहे आणि ती सध्या सराव करीत आहे. तिचे गुलाबी रंगाचे कपडे देखील रुग्णांना आवडत आहेत. लोक तिच्या फोटोंवर बरेच कमेंट्स देत आहेत. द सनच्या वृत्तानुसार, निंग चेन ताइचंग डेटिस्ट्री चेन डॉक्टर मिनमध्ये नोकरी करत आहे आणि अनेक मुले आजारपणाचे खोटे कारण सांगून दिला भेटण्यासाठी येतात. ते आजारपणाच्या सोंग घेऊन तिच्याशी बोलू इच्छितात. निंग सांगते की, मला विश्वास नाही की मी जगातील सर्वात सुंदर नर्स आहे. मी खूप आनंदी आहे आणि लोकांची मी खूप आभारी आहे.

डॉक्टर मिनमध्ये एक ड्रेसकोड आहे, जो प्रत्येक नर्सला घालणे बंधनकारक आहे. निंगचे हे कपडे सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल होत आहेत. कारण गुलाबी ड्रेसमध्ये ती एका राजकन्येसारखी दिसते. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते आणि आपले नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतच आहेत. तिचे इंस्टाग्रामवर ३१ हजार आणि १० हजार फॉलोअर्स फेसबुकवर आहेत आणि ते वाढतच आहेत. एवढेच नाही तर, तिला भेटण्यासाठी क्लिनिकच्या बाहेर मुलांची एक लांब रांग लागलेली असते. निंगने सांगितले की, माझा एक बॉयफ्रेंड देखील आहे आणि तो देखील हे सर्व ऐकून आनंदी आहे. जेव्हा लोक खोट्या आजाराने येतात तेव्हा मला खूप हसू येते, पण मला दात साफ करणे मला खूप आवडते.

Leave a Comment