हे आहेत प्रेमात पडल्याचे साईड इफेक्ट्स


फोटो सौजन्य यु ट्यूब
प्रेमात पडण्याला आपल्याकडे प्रेमरोग असे नाव आहे. याचाच अर्थ प्रेम हा आजार आहे असा होतो. प्रेम कुणाचे, कुणावर, कधी आणि कुठे जमेल हे सांगणे अवघड आहे तसेच लोक प्रेमात का पडतात हेही एक न सुटलेले कोडे आहे. प्रेमात पडल्याचे साईड इफेक्ट्स मात्र नक्की दिसतात हे आता अमेरिकेच्या न्यूजर्सी मधील रटगर्स विद्यापीठात झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

प्रेम सांगून होत नाही, प्रेमाची भावना अचानक मनात जागी होते, त्यामुळे मनाला आनंद मिळतो हे खरे आहे तसेच प्रेमात पडल्याने आजाराची काही लक्षणेही दिसतात हेही खरे आहे. संशोधनात असे दिसून आले की माणूस प्रेमात पडला की मेंदूचा जो भाग निर्णय घेण्याचे महत्वाचे काम करत असतो त्याचे नियंत्रण बिघडते. प्रेमात पडलेल्या माणसाच्यात डोपामाईन, अॅक्सिटोनिन, अॅड्रमलीन, वेसोप्रेसीन ही रसायने अधिक प्रमाणात रिलीज होतात. ही रसायने माणसाला नशा आणतात त्यामुळे माणसाला प्रेमाचे व्यसन लागते.


प्रेमात पडल्यावर स्ट्रेस हार्मोन कर्टिसोल रक्तप्रवाहात मिसळून पोटात जाते आणि त्यामुळे पोट गुडगुडते. याला लव्ह सिकनेस असेच नाव आहे. भूक कमी होते, झोप कमी होते, आपण एकदुसऱ्याशिवाय राहूच शकणार नाही अशी भावना मनात दृढ होते. हार्मोन्स मध्ये बदल होतात. व्यक्ती पारखणारा मेंदूचा भाग कमजोर होतो त्यामुळे ज्याच्या प्रेमात पडता त्याचे दोष दिसत नाहीत. मेंदूत अनेक रसायने निर्माण होतात आणि त्यामुळे आकाशात विहरत असल्याची भावना निर्माण होते, खूप उत्साह वाटतो, वजन वाढते आणि काही वेळा रक्तदाब वाढतो. प्रेमात पडल्याचे शरीरावर इतके सारे साईड इफेक्ट दिसतात.

Leave a Comment