फातिमा सना शेख बनली मराठी मुलगी


फोटो सौजन्य जागरण
दंगल मध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर विराजमान झालेली अभिनेत्री फातिमा फना शेख आता मराठमोळ्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने मराठी मुलीच्या वेशातला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आगामी सुरज पे मंगल भारी असे या चित्रपटाचे नाव आहे. अभिषेक शर्मा याचे दिग्दर्शन करत आहेत. झी स्टुडीओ निर्माते असून मुंबईत अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शुटींग पार पडले आहे.

फातिमा यात मराठी मुलीची भूमिका करत असून त्यासाठी शुटींग सुरु होण्यापूर्वी तिने मराठी बोलण्याचे खास प्रशिक्षण घेतले आहेच पण आपली देहबोली मराठी मुलीसारखी व्हावी यासाठी खास प्रयत्न केले आहेत. फोटोमध्ये फातिमा लाल साडी, हातात लाल बांगड्या, कपाळाला टिकली, कानात झुमके आणि नेकलेस अश्या वेशात फारच गोड दिसते आहे.

फातीमाची ही भूमिका तिच्या चाहत्यांना मेजवानी ठरेल असा विश्वास अभिषेक शर्मा यांनी व्यक्त केला आहे. फातीमाची निवड करण्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, फातिमा कठोर आणि कोमल अश्या दोन्ही भावना सहजतेने व्यक्त करू शकते. ती बुद्धिमान अभिनेत्री आहे. आणि कामाशी तिची निष्ठा जबर आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी तिचाच विचार केला गेला.

Leave a Comment