वासिम अक्रमची पत्नी शनायारा चित्रपटपडद्यावर


फोटो सौजन्य खास खबर
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि स्विंगचा सुलतान अशी ओळख असलेल्या वासिम अक्रमची पत्नी शनायारा आता चित्रपटात झळकणार असल्याचे वृत्त द डॉनने दिले आहे. या बातमीनुसार शोबीज दुनियेत शनायारा काही फॅशन शो रँपवर यापूर्वी दिसली आहे मात्र ती सोशल मिडियावर सामाजिक प्रश्नांवर जागृती करण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे.

शनायाराने तिच्या ट्विटर अकौंटवर शुटींगचा अनुभव शेअर केला आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव मनी बॅक गॅरंटी असे आहे. शनायारा लिहिते, माझी ही पहिलीच पाकिस्तानी फिल्म आहे. १० दिवस शुटींगच्या दरम्यान सेटवर टाचेवर येत असलेला ताण, बाथरूम मध्ये अडकणे, टीटॅनसचे वेदनादायी इंजेक्शन, झोपेविना रात्री, खायला चिप्स, रोमांटीक प्रसंग आणि नवीन भाषा अश्या अनेक अडचणीत वावरले. हा सर्व काळ स्वतःपासून दूर राहून अनुभवला. हे सर्व अनुभवल्यावर मला मनी बॅक गॅरंटी मिळायला हवी असे तुम्हाला वाटते ना?

Leave a Comment