या एअरलाईन्सच्या प्रेमात पडले दिल्ली एअरपोर्ट

व्हेलेंटाईन डे निमित्ताने सर्वत्र प्रेमाची चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत आहे. दिल्ली विमानतळाने देखील व्हेलेंटाईन डे च्या निमित्ताने आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. हो, हे खरे आहे. चक्क विमानतळाने एअरलाईन्सबद्दल असलेल्या आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

दिल्ली विमानतळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हटके पद्धतीने इंडिगोबद्दल असलेल्या भावना व्यक्त करण्यात आल्या असून, नेटकऱ्यांना देखील ही स्टाईल भलतीच आवडली आहे.

दिल्ली विमानतळाने ट्विट केले की, हेय इंडिगो, वचन दे की तुमच्या रनवे पासून कधीच दूर जाणार नाही. सोबतच #ValentinesDay2020 देखील वापरले.

दिल्ली विमानतळाच्या ट्विट अकाउंटवरून केलेले हे ट्विट युजर्सला भलतेच आवडले. याला उत्तर देताना इंडिगोने ट्विट केले की, ओह डार्लिंग, तुझे प्रेम नेहमीच मला अगदी वेळेत परत आणते. प्रत्येक वेळी.

दोघांनी आपल्या ‘भविष्यातील प्लेन्स’ देखील ठरवले. दिल्ली विमानतळाने लिहिले की, माय लव्ह इंडिगो, एकमेंकासोबत आपले भविष्यातील अनेक प्लान्स आहेत.

यावर इंडिगोने मजेशीर उत्तर दिले की, जेव्हाही तू असे काहीतरी म्हणतो, तेव्हा मला ‘कुछ कुछ होता है.’

इंडिगोबद्दल आपले प्रेम व्यक्त करत दिल्ली विमानतळाने ट्विट केले की, मी केवळ तुझ्यासाठीच वेडी आहे.

यावर इंडिगोने देखील ‘मला माहिती आहे तुझे प्रेम यापेक्षाही पुढे जाईल’, असे म्हणत उत्तर दिले.

नेटकऱ्यांना प्रेम व्यक्त करण्याची ही हटके स्टाईल खूपच आवडली. हे संवाद चांगलेच व्हायरल झाले.

दिल्ली विमानतळाने अनेक एअरलाईन्स एअर इंडिया आणि विस्ताराबद्दल देखील ट्विटरवर हटके पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचेच मन जिंकले.

Leave a Comment