व्यसन सोडा अथवा नोकरी सोडा, या कंपनीची कर्मचाऱ्यांना सुचना

गुजरातमधील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्याप्रती जागृक करण्यास सुरूवात केली आहे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे मेडिकल चेकअप करण्यात येत आहे. आता एका कंपनीने थेट व्यसन सोडू शकत नसाल, तर नौकरी सोडण्याची सूचना कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

राजकोटच्या पर्व मेटल ग्रुप ऑफ कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची दारू, तंबाखू, सिगरेट यासारख्या व्यसनापासून सुटका करण्यासाठी मागील वर्षी जूनमध्ये एक खास अभियान चालवले होते. यासाठी कंपनीने 150 कर्मचारी आणि अन्य स्टाफचे व्यस्न सोडवण्यासाठी अनेक कार्यक्रम केले. याचा फायदा देखील कर्मचाऱ्यांना झाला. यानंतर कंपनीने सुचना दिली की, जर कर्मचाऱ्यांनी व्यसन सोडले नाही तर त्यांना नोकरी गमवावी लागेल.

कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर सहदेव सिंह झाला यांनी सांगितले की, पुण्यातील टाटा ग्रुप आणि जर्मनी, चीन, अमेरिकेतील कंपन्यांपासून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे व्यसन सोडवण्यासाठी एक विशेष कार्यक्रम तयार केला. ज्यात आम्हाला यश देखील मिळाले.

झाला यांनी सांगितले की, जेव्हा कर्मचाऱ्यांना वाईट सवयी सोडण्यासाठी सांगितले तेव्हा अनेकांना ते आवडले नाही. त्यावेळी आम्ही त्यांना नोकरी सोडा अथवा व्यसन सोडा, अशी सुचना दिली. आम्ही त्यांना फॅक्ट्रीमधील एका मोठ्या स्क्रीनवर व्यसन मुक्तीचे प्रवचन आणि व्हिडीओ दाखवले. याचा सकारात्मक परिणाम झाला.

मंदीच्या काळात नौकरी जाऊ नये म्हणून अनेक कर्मचाऱ्यांनी व्यसन सोडून नोकरी स्विकारली, असेही झाला यांनी सांगितले.

झाला यांच्यानुसार, जर व्यसन सुटले तर ते पुन्हा लागण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी आम्ही योगाची मदत घेतली. काम सुरू करण्याआधी सर्व कर्मचाऱ्यांनी योगा करावा असा नियम बनवला. यामध्ये मालक देखील सहभागी होतात. मागील 5 महिन्यांपासून असे सुरू आहे.

Leave a Comment