भारत-चीन युद्धामुळे तुटले होते रतन टाटा यांचे लग्न

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी फेसबुकवरील लोकप्रिय पेज ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी आपल्या बालपणीच्या आठवणी, प्रेमासंबंधित खाजगी माहिती शेअर केली आहे.

टाटांनी लिहिले की, लॉस एंजिल्समध्ये कॉलेजचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी एका आर्किटेक्चर कंपनीत काम करण्यास सुरूवात केली. 1962 चा काळ खूपच चांगला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कारण त्यावेळी ते प्रेमात पडले होते.

त्यांचे लग्न देखील जवळपास ठरले होते. मात्र आजीची तब्येत बिघडल्याने टाटा भारतात परतले. भारतात परतताना टाटांना वाटत होते की, ज्या मुलीवर ते प्रेम करतात ती देखील त्यांच्याबरोबर भारतात येईल. मात्र चीन-भारत युद्धामुळे त्या मुलीच्या आई-वडिलांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला व त्यासोबतच ते नाते संपले.

(1/3) “I had a happy childhood, but as my brother and I got older, we faced a fair bit of ragging and personal…

Posted by Humans of Bombay on Wednesday, February 12, 2020

रतन टाटा 10 वर्षांचे असतानाच त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. त्यांची आजी नवजबाई यांनी त्यांना सांभाळले. रतन टाटा सांगतात की, आई-वडिल वेगळे झाल्याने मला व माझ्या भावाला काही अडचणी आल्या, मात्र तरी देखील आमचे बालपण आनंदात गेले.

टाटांनी सांगितले की, दुसरे विश्वयुद्धानंतर आजी आम्हाला लंडनला घेऊन गेली. तिनेच आम्हाला आयुष्यातील मुल्यांचे महत्त्व सांगितले. तिने समजवले की प्रतिष्ठा सर्वात मोठी गोष्ट असते.

रतन टाटांना लहानपणी वायलिन शिकायचे होते, मात्र त्यांचे वडिल त्यांना पिआनो शिकवण्यावर जोर देत.  रतन टाटा यांचे विचार वडिलांशी आजिबात जुळत नसे. टाटांनी त्यांचे शिक्षण अमेरिकेत करायचे होते, तर वडिलांना त्यांना ब्रिटनला पाठवायचे होते. टाटांना आर्किटेक्ट बनायचे होते, तर वडिलांना त्यांना इंजिनिअर झालेले पाहायचे होते.

टाटांनी सांगितले की, जर आजी नसती तर मी अमेरिकेत शिक्षण घेऊ शकलो नसतो. आजीमुळे मॅकेनिकल इंजिनिअरिंग बदलून आर्किटेक्टमध्ये अॅडमिशन घेतले. यामुळे वडील देखील नाराज होते.

टाटा सांगतात की, आपले मत मांडण्याची हिम्मत देखील विनम्र आणि सभ्यरित्या दाखवता येते, हे देखील आजीने शिकवले.

Leave a Comment