कोरोना; भितीने चीनमध्ये चक्क प्राण्यांना देखील घातले मास्क

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1 हजार पेक्षा अधिक जणांचे प्राण गेले आहेत, तर हजारो लोकांना याची लागण झाली आहे. या व्हायरसचा धसका अनेक पाळीव प्राण्यांच्या मालकांनी देखील घेतला असून, चक्क कुत्रे आणि मांजरांना देखील चीनमध्ये मास्क लावले जात आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे की, प्राण्यांना या व्हायरसचा संसर्ग होईल याचा काहीही पुरावा नाही. मात्र असे असले तरी देखील चीनमधील नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना मास्क लावताना दिसत आहेत.

https://twitter.com/WBYeats1865/status/1226941535888891904

चाइनीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हीईबोवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राण्यांना मास्क लावल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ट्विटरवर देखील असे अनेक फोटो शेअर करण्यात आले असून, हे फोटो व्हायरल होत आहेत.

चीनचा राष्ट्रीय आरोग्य आयोग मात्र जागतिक आरोग्य संघटनेशी सहमत नाही. प्रवक्ते आणि संसर्गरोगतज्ञ ली लँनजुन यांच्यानुसार, जर पाळीव प्राणी बाहेर आले आणि त्यांचा या संसर्ग असलेल्या व्यक्तीशी संपर्क झाला. तर प्राण्यांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यावेळी त्यांना वेगळे करावे लागते. त्यामुळे पाळीव प्राण्यांसंबधी काळजी घेणे गरजेचे आहे.

वर्ल्ड स्मॉल एनिमल व्हेटेरनिटी असोसिएशनने सर्व मांजरीच्या मालकांना देखील आपल्या प्राण्याला काही दिवस घरातच ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Comment