आता हिंदीतही प्रसारित होणार ‘रात्रीस खेळ चाले’


कोकणाच्या पार्श्वभूमीवर आधारित झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार रात्रीस खेळ चाले ही मालिका खूपच लोकप्रिय झाली असून एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा मालिकेत माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांवर आधारित अशीही मालिकेला अल्पावधीतच प्रचंड यश मिळाले.

या मालिकेत कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही त्यातील व्यक्तिरेखा राज्यातील प्रत्येक घराघरांत लोकप्रिय ठरल्या. सुरुवातीला या मालिकेला विरोध झाला खरा पण तरीही ही मालिका दोनशे भागांच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. हिच मालिका आता हिंदीतही प्रसारित करण्यात येणार आहे.

आता हिंदीमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका डब करण्यात आली असून हिंदीत या मालिकेचे ‘रात का खेल है सारा’ असे नाव ठेवण्यात आले आहे आणि ही अॅन्ड टीव्ही वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ही मालिका २९ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment