चीनमधून परतलेल्या अधिकाऱ्याला किंम जोंग उनने घातल्या गोळ्या

उत्तर कोरियाचे शासक किंम जोंग उन आपल्या हुकुमशाही पद्धतीसाठी जगभरात ओळखला जातो. येथे एका छोट्याशा चुकीसाठी देखील मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. जगभरात कोरोना व्हायरसची लस शोधण्याचा प्रयत्न केला जात असताना. मात्र उत्तर कोरियात या व्हायरसचा संसर्ग झालेल्याना चक्क गोळ्या घातल्या जात आहेत.

कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या संशयाने एका अधिकाऱ्याला आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या अधिकाऱ्याने चुकीने सार्वजनिक बाथरूमचा वापर केला. त्याची किंमत या अधिकाऱ्याला चुकवावी लागली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, या व्यक्तीला चीनमधून परतल्यानंतर वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. सार्वजनिक बाथरूम वापरल्याने त्याला व्हायरस पसरवणे आणि नियमांचे उल्लंघन करणे, यासाठी दोषी ठरविण्यात आले व त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

किंम जोंग उन यांच्या परवानगी शिवाय क्वेंरेटाइन (संसर्ग झालेल्या लोकांसाठीची जागा) सोडून जाणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. यूके मिररच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा एजेंसीच्या एका अधिकाऱ्याने चीनचा प्रवास केल्याची माहिती लपवल्याने त्याला देखील देशातून काढण्यात आले होते.

उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरसद्वारे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. मात्र प्योंगयांगचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

चीनपासून केवळ 1400 किमी अंतरावर असलेल्या देशात कोरोना व्हायरसची लागण झाली नसेल, असे म्हणणे चुकीचे असल्याचे विश्लेषकांना वाटते.

उत्तर कोरियाच्या आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी बॉम यांनी देखील देशात कोरोना व्हायरसचे एकही प्रकरण समोर आले नसल्याचे म्हटले होते.

Leave a Comment