आजवर कुणीही दिल्या नसतील रोहित पवारांसारख्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा !


मुंबई: कायमच राज्यासह देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राहिले आहेत. गेली अनेक वर्ष त्यांनी कुशाग्र बुद्धीच्या जोरावर राजकारणात आपला स्वत:चा एक ब्रँड तयार केला आहे. पण जनमानसासमोर त्यांच्याच कुटुंबातील आणखी एक नेता अशाच पद्धतीने येत आहे. हा नेता म्हणजे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार असून रोहित पवार हे काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड या मतदारसंघातून भाजपचे दिग्गज मंत्री राम शिंदे यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले होते. रोहित पवार यांची तेव्हापासून तरुण नेते म्हणून बरीच चर्चा सुरु झाली.


गेल्या काही महिन्यात संयमी आणि हुशार अशी ओळख बनवलेल्या रोहित पवार यांनी आपली राजकीय प्रल्गभता देखील दाखवून दिली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात संयमी वक्तृत्व आणि समोरच्या व्यक्तीच्या काळजाला हात घालण्याची असणारी हातोटी यामुळे अल्पावधीतच स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दुसरीकडे रोहित पवार हे सोशल मीडियावर देखील तितक्याच प्रगल्भतेने आपली मते मांडत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी आता त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीला राजकीयदृष्ट्या कसे वळण द्यायचे हे देखील चांगलेच अवगत झाले आहे. नुकत्याच केलेल्या एका ट्विटवरुन आता हे समोर आले आहे.

आज तरुणाईच्या आवडीच्या अशा ‘व्हॅलेंटाइन डे’च्या तरुणाचे नेते अशी ओळख असलेल्या रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पण रोहित पवारांनी या शुभेच्छा देताना ज्या पद्धतीने त्याला राजकीय वळण दिले आहे त्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

Leave a Comment