पोलीस दलात दाखल झाली ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस’ कर्मचारी

न्यूझीलंडने देशातील पहिली एआयवर (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) आधारित पोलीस  कर्मचारी  सादर केला आहे. या कर्मचारीला ‘एला’ नाव देण्यात आलेले आहे. पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एलाला वेलिंग्टन येथील पोलीस मुख्यालयात नेमण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनुसार, मनुष्याप्रमाणे दिसणाऱ्या एलाला 26 वेगवेगळ्या लोकांची वैशिष्ट्य मिळून तयार करण्यात आले आहे.

सध्या एला डिजिटल पोलीस ‘कियोस्क’चा भाग आहे. एलाला लोकांच्या तक्रारी दाखल करणे व त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यामुळे पोलिसांना तर मदत होईल. सोबतच नागरिकांना देखील त्वरित माहिती मिळण्यास मदत होईल. पोलिसांनुसार, एलाला डिझाईन करण्याचे व विभागात तैनात करण्याची कल्पना प्रोजेक्ट मॅनेजर एरिन ग्रॅनली यांची होती.

Leave a Comment